मी काटकुळा अन माझा प्रतिस्पर्धी राकट होता!
घेवून नाव देवाचे, भिडण्याचे धाडस केले!!
प्रतिस्पर्धी ह्या शब्दात 'स्प' चे वजन 'ति' वर येत असल्याने त्याचा उच्चार लगागागा असा होतो; मात्र वरील ओळीत तो गागागा असा आवश्यक असल्याने कानाला बरा वाटत नाही.
बलवंत प्रतिस्पर्धी अन् दुबळाच जरी मी होतो ...
असा काहीसा बदल केल्यास काही प्रमाणात सुसह्य होऊ शकेल असे वाटते. (येथेही 'प्र' चे वजन 'त' वर आल्याने कदाचित तितके बरे वाटणार नाही; पण 'त' आणि 'प्र' हे वेगळ्या शब्दांत असल्याने चालवून घेता येईल असे मनात आले.)