कुत्रा पाळणे हा एक वसा आहे. १०-१२ वर्षे त्याचे सगळे करायला जमणार आहे का? भुभू म्हणजे एक प्रकारे लहान मूलच असते. फार लळा लागतो. तो गेल्यावर फार वाईट वाटते. माझ्या मुलीने १ लीत असताना बिट्टू आणला. ती नववीत असताना तो काविळीने गेला. मंदिरात एक कुत्री व्याली होती. त्यातील एक डोळे न उघडलेले पिल्लू उचलून आणले होते. फारच लळा लागला होता. खूप खोडकर होता.  पाळीव प्राण्यांबद्दल बरीच पुस्तके आहेत. त्यात माहिती मिळते. पुण्यात कोथरुडला डॉ. विनय गोऱ्हे आहेत ते याबद्दल अधिक माहिती देतील.