मी कुटुंबापासून  दूर जेथे जेथे राहिलो तेथे माझा जो कोणी सहनिवासी असेल तो तो निष्णात स्वयंपाकी निघाला हे माझे सुदैव. मात्र तसे झाल्याने माझ्या वाट्याला केवळ भाज्या चिरणे आणि भांडी धुणे ही कामे येत गेल्याने माझे स्वयंपाकी कौशल्य दुर्दैवाने केवळ तितक्यापुरतेच विकसित झाले.