१. कसल्या जातीचा कुत्रा पाळता येईल. (शक्यतो पांढरा / तपकिरी रंगाचा हवा आहे)

साध्या गावठी पासून ते खास ब्रीडींग केलेले अनेक जातींचे कुत्रे उपलब्ध असतात. कुठलाही पाळा. विशिष्ठ रंगाचा आग्रह का ते कळले नाही तरी, गोल्डन रिट्रिवर ह्या जातीचे कुत्रे पांढरट-तपकिरी रंगात मिळतात. त्यांचा विचार करा. माझ्याकडे तोच आहे. अत्यंत लाघवी जमात!


२. कुत्र्याच्या जातीप्रमाणे लसीकरण व तसेच इतर औषधे बदलतात काय?

बहुधा नसावीत. तरीही जवळच्या वेटरनरी डॉक्टरकडे चौकशी करावी.


३. साधारणपणे त्यांची काय काळजी घ्यावी लागते?

अगदी घरी नवीन आलेल्या लहान मुलाप्रमाणे. वर प्रकाश घाटपांडे यांनी सांगितल्यानुसारे तो एक वसाच आहे. पेलणे शक्य असेल तरच घ्यावा. (उतू नये, मातू नये, घेतला वसा सोडू नये !!!)


४. आम्ही पुर्ण शाकाहरी आहोत. त्यामुळे कुत्रा पण शाकाहारीच राहिल.  

कुत्र्याची काहीच हरकत असणार नाही !!!


५. पुण्यामध्ये पाळीव प्राणी मिळण्याचे खात्रीचे दुकान कोणते आहे?

ठाणेकर असल्यामुळे प्रश्न पास!