लेख वाचताना अगदी स्वतःच प्रवास करून आल्यासारख वाटल. अंधारातली अगदी अशीच कसरत माझी कशेळी आणि रत्नागिरीच्या मध्ये झाली होती. निबीड अंधारात रस्ता चुकला हे ध्यानात आल्यावर , एका ठिकाणी रस्ता विचारण्यासाठी मी एका मोटरसायकल वर बसलेल्या माणसाला हात दाखवला, तर तो घाबरला आणि मोटरसायकल जोरात हाकून पळून गेला.
तुमची लेखनशैली अगदी बांधून ठेवणारी आहे. वाचताना मजा आली.