१. चीकात दुध किती घालायचे हे अंदाजाने थरवावे लागते. चीक किती घट्ट आहे त्यावर ते अवलंबून आहे. शहरात विकतचा चीक मिळतो त्यात बरेच वेळा दुध मिसळून विकतात. कारण चीकाला दुधाच्या दुप्पट भाव असतो! तसेच, चीक पहिल्या दिवसाचा आहे कि काय ते विकणाराही सांगू शकणार नाही असे सारे गौडबंगाल असते..... तेव्हा हा सगळा अंदाजाचा मामला आहे..
२. साखरे ऐवजी गुळ नक्कीच चांगला लागतो. म्हणजे, जरा खमंग लागतो. हे म्हणजे बरेच लोक पुरण पोळीत देखिल साखर मिसळतात तसे झाले... खरे तर गुळाने छान चव येते.
३. कुकरची शिट्टी करावयाची गरज पडत नाही. साध्या स्टीमर मध्ये दहा ते पंधरा मिनिटात मस्त पैकी होतो. जरा पसरट भांड्यात केला कि व्यवस्थीत होतो, शिट्टी लावावी लागत नाही, वेळ पण लागत नाही.
४. काही जण गरम गरम खरवस पसंत करतात. हे म्हणजे काही जण गरम बासुंदी खातात आणि काही जण थंड गार करून खातात तसेच आहे..