पत्रिका बघून treatment च्या दृष्टीने पण अनुकूल दिवस बघता येतात . पत्रिकेचा उपयोग योग्य पद्धतीने केला तर जीवन सुसह्य होण्याला मदतच होते .
हा भ्रम आहे. पत्रिका, ग्रहांची स्थिती आणि गर्भधारणा यांचा एकमेकांशी काडीचाही संबंध नाही. स्त्रीच्या शरीरात निर्माण होणारे बीजांड आणि पुरुषाचे शुक्राणू यांच्या फलनासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण झाली की गर्भधारणा होते. त्या वेळी मग कोणता ग्रह कुठे आहे, कुणाची  कुणाबरोबर
युती आहे याचा संबंध नाही.
वर्षानुवर्षे लोक एखादी गोष्ट करत आअहेत म्हणून त्यावर विश्वास ठेवा असे म्हणणे हा भाबडेपणा आहे. वर्षानुवर्षे लोक जातपात, सती जाणे, नरबळी यावरही विश्वास ठेवत होते. म्हणून आज त्या गोष्टींचाही स्वीकार करावा काय?
बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आहे हेही खोटे आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या चाचण्यांत असा कोणताही अनुभव येत नाही असे दिसून आले आहे.
मुळात ज्योतिष हे शास्त्रच नाही. शास्त्रात कारण व परिणाम -कॉज ऍंड इफेक्ट- असे असते. ज्योतिषात असे काहीही दिसून येत नाही.
सदर लिखाण तुम्ही व्यवसायाची जाहिरात म्हणून करत असाल किंवा नसाल, पण त्यातून तुम्ही समाजाला चिकित्सावादापासून दूर नेण्याचे अत्यंत विघातक काम नक्की करत आहात. त्यामुळे माझी यावर श्रद्धा आहे की नाही हा विषयच नाही. विवेकाची गळचेपी करणाऱ्या अशा प्रयत्नांना सतत विरोध करणे हे प्रत्येक जागरुक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मी समजतो.