माझा जोतिषशास्त्रावर ५० टक्के विश्वास आहे. याचे कारण मला जे जे भविष्य सांगण्यात आले आहे ते ते सर्व खरे ठरले आहे.  अगदी परदेशगमनाचा योग आहे हे सुद्धा मला लग्ना आधी बरेच जणांनी सांगितले होते. कुंडलीचा अभ्यास जर दांडगा असेल तर सांगितलेले भाकीत खरे ठरते. अर्थात काही अपवाद आहेतच. सर्वच्या सर्व काही खरे होत नाही. पण एक मार्गदर्शक म्हणून या शात्राकडे बघायला काहीच हरकत नसावी.