संजोप राव, कोणत्याही गोष्टीचा नित अभ्यास न करता त्याविषयी टोकाची मते प्रगत करणे हे योग्य नाही असे मला वाटते . 
ज्या गोष्टीनी कोणाचे काही नुकसान होत नाही उलट 
मानसिक ताण असलेल्यांना एक नवीन अशा मिळते . ती गोष्ट वाईट कशी . तसेच ह्या लेखात कुठेही अमुक तमुक पूजा करा किंवा पैसे खर्च करा असा कुठेही उल्लेख नाही. तसेच वैद्यकीय सल्ला घेऊ नका असेही कुठे लिहिले नाहीये . त्यामुळे उगाचच सती जाणे, नरबळी वगेरे उदाहरणे देण्याची काहीच गरज नाही. 
तसेच तुम्ही उल्लेख केलेल्या प्रथांनी समाजाचे नुकसान झाले आहे. परंतु पत्रिका बघणे हि काही प्रथा नव्हे . 
त्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र असल्याने तुम्ही आपले विचार मांडा. परंतु उगाचच मोठे शब्द वापरून दोषी ठरवणे योग्य नाही.