अत्यंत बालीश प्रतिसाद. लोकांचा अभ्यास आणि समाजातले नाव (समाजात नाव काय, लालूप्रसाद यादव यांचेही आहे! ) यापेक्षा आपले स्वतःचे मत काय, आपली जाण किती हे कळाले तर बरे होईल.
दारुचे उदाहरण अत्यंत समर्पक आहे. आपल्याला ते कळाले नसेल, किंवा ते समजून घेण्याइतपत आपली मानसिक परिपक्वता नसेल तर त्याला माझा नाईलाज आहे.
डोळसपणे, सजगतेने आणि आहारी न जाता विचार करणारा माणूस पत्रिका, फलज्योतिष यांना कचऱ्याची टोपली दाखवेल. आपल्या विधानांतील विरोधाभास लक्षात न येण्याइतपत आपले ब्रेनवॉशिंग झाले आहे काय?
नुसते वाचा, अभ्यास करा असले लिहून काही साध्य होणार नाही. ज्योतिष हे शास्त्र आहे हे पटवून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान स्वीकारता? पाच लाखाचे बक्षिस आहे.
ते जुने झाले. भारतात २०१४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे दावेदार आहेत. भारतिय जनता पक्ष आणि काँग्रेस हे सत्तेचे दावेदार आहेत. काय तुमच्या ग्रह-ताऱ्यांच्या स्थिती - युति-बिती असेल त्याचा अभ्यास करा आणि पुढच्या वर्षीचे मंत्रीमंडळ कागदावर मांडून दाखवा. आहे तयारी?
आता यावर माझा तेवढा अभ्यास नाही, किंवा असले काम माझ्या हातून होण्याचा योग माझ्या कुंडलीत नाही असले उत्तर येणार असेल तर माझी सपशेल शरणागती.
शेवटी हा अट्टाहास कशासाठी? 'मनोगत' या संकेतस्थळाचे आणि माझे जुने नाते आहे. वैचारिक परिपक्वता हे या संकेतस्थळाचे वैशिष्ट्य आहे असे मी मानतो. तुम्ही सुरू केलेल्या धाग्यांसारख्या थिल्लर धाग्यांना इथे स्थान नाही. (त्यासाठी वेगळी संकेतस्थळे आहेत! ) त्यामुळे 'मनोगता'ची शुचिता जपावी म्हणून तरी तुमच्या लिखाणासारख्या बुरसटलेल्या प्रतिगामी विचारांना विरोध केला पाहिजे असे मला वाटते.