कुत्रा पाळायचा असेल तर सल्ला देण्यास सर्वात लायक माणूस म्हणजे घाटपांडे. त्यांचे मत त्यांनी वर दिले आहेच. आम्ही छिद्रान्वेषी  असल्याने आम्हाला नको तेच सुचते. त्यामुळे आमचा प्रश्न असा की कुत्र्याच्या 'विधीं'ची तुम्ही काय योजना करणार आहात?  आमच्या बघण्यातले बरेचसे लोक कुत्रे फिरवायला बाहेर घेऊन जातात आणि रस्त्यावरच त्यांना 'बसवतात'. तसे करणार असाल तर कृपया कुत्रा पाळू नका.