कोकणात खरवसात ओला नारळ घालतात. अप्रतिम चव लागते. सोबत हळदीचे पान असेल तर ते ही वापरून पहा. हळदीच्या पानाची छान खमंग चव लागते. जगातले कुठलेच मिल्क पुडिंग याची बरोबरी करू शकणार नाही. साखर अगदी पर्याय नसेल तरच वापरा अन्यथा गुळाची सर साखरेला नाही.....
बाकी, घरची गाय व्याली आणि तिचा चीक ओरपायला मिळावा, यासारखे सुख नाही. नवीन वासरू घरात नवीन चैतन्य आणते. असो, धन्यवाद रोहिणी. बऱ्याच आठवणी ताज्या झाल्या....