पुन्हा तेच तेच लिहीत बसणे म्हणजेच मुद्दे संपले असे मान्य करणे.
मी मनोगताचा प्रतिनिधी अर्थातच नाही. पण मनोगतावर जाहीर प्रतिसाद देणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी (झाली) आहे. आपल्या पोकळ लिखाणाबद्दल मी घेतलेल्या भूमिकेचे लोकांनी समर्थन केले आहे ते मला पाठवलेल्या व्यक्तिगत निरोपांतून. पण ते आपल्याला ठाऊक असण्याचे काही कारण नाही.
मनोगताचे व्यवस्थापन लेखकांच्या भूमिकेबाबत अत्यंत तटस्थ आहे ( आणि ते मनोगताचे एक बलस्थान आहे) त्यामुळे लेखन मनोगताच्या प्रकाशनाच्या बाबतीत धोरणांशी सुसंगत असले की ते प्रसिद्ध होते. याचा अर्थ प्रकाशकांना ते पटलेले असते असा नाही.
मी अर्थातच लिहित राहीन. जोवर अशा अर्थाचे बाष्कळ लिखाण प्रसिद्ध होत राहील, तोवर मी माझ्या परीने त्याला विरोध करीत राहीन. किमान जिथे माझे काही आतडे गुंतलेले आहे अशा संकेतस्थळांवर तरी. बाकी अशा लिखाणाला वाहवा देणाऱ्या संकेतस्थळांची सुमारसद्दी आहे. तिकडे कुरण आपलेच आहे.