हा वाद जवळ जवळ दोघातच चालू होता असे दिसते. मी स्वतः ज्योतिष्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे व आता आमची नातवंडेच संतती होण्याया वयात असल्यामुळे लेख उघडून वाचण्याचे श्रमही घेतले नाहीत. पण त्यावर  प्रतिसादांची संख्या पाहिल्यावर वाटले की खरोखरी मनोगतींनी यात रस घेतलेला दिसतो व अंधश्रद्धानिर्मूलनाचे खंदे पुरस्कर्ते  डॉ.नरेंद्र दाभोळकर यांया हत्येमुळे जनतेत जागृती झालेली दिसते व अश्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या कमी झालेली असेल या आशेने लेख व प्रतिसाद पाहिल्यावर मनोगतींनी तो एकदम अंगाबाहेरच टाकला आहे हे पाहून आशर्य वाटले. मात्र श्री‌. संजोप राव यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे एवढेच नमूद करतो.