कांदळकर, कुशाग्र, मराटीप्रेमी,
पाठिंब्याबद्दल आभार. मी अजिबात हातपाय गाळले नाहीत. अशा विचारांना तर्काने आणि विवेकवादाने उत्तर देण्याचा प्रयत्न मी माझ्या कुवतीनुसार सुरुच ठेवणार आहे. फक्त मुद्दे संपले म्हणून वाद संपवला इतकेच.
दोन लोक एका पुलावरून समोरासमोरून येत होते. पुलावरून एका वेळी एकाला जाता येईल इतकीच जागा होती. एकजण उर्मटपणे म्हणाला, मी मूर्खांना कधीही जागा करून देत नाही.  दुसरा विनयाने म्हणाला, मी नेहमी देतो, आणि बाजूला सरकला. हे आठवले.