मला सांगितलेले भविष्य ठळकपणे खरे झालेले आहे. मग मी याला थोतांड कसे म्हणू??
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आपले हे मत सविनय मान्य.
हे एक शास्त्र आहे
हे तितक्याच सविनय सपशेल अमान्य. शास्त्र किंवा विज्ञानाच्या काही मूलभूत नियमांनाच ज्योतिष छेद देते. त्यामुळे ते एक शास्त्र आहे हे मला अजिबात मान्य नाही.
उदाः कोणत्याही अधिकारी व्यक्तीने सांगितले म्हणून वा ग्रंथात लिहिले म्हणून खरे मानणे चूक आहे. विश्व हे विशिष्ट नियमांनी बद्ध आहे. या नियमांचे ज्ञान प्रयोग, तर्क व पडताळा या गोष्टींनी मिळते. पृथ्वी हा विश्वाचा केंद्रबिंदू नाही. वैज्ञानिक दृष्टीकोनाची सिद्धता करण्यासाठी करावयाच्या प्रयोगात प्रयोगाच्या परिस्थितीवर पूर्ण ताबा असतो. विज्ञान हे सार्वजनिक असते. वैज्ञानिक सत्य हे सर्वांसाठी खुले असते. ज्या कोणाला त्याविषयी कुतुहल असते त्यांना ते तपासून घेता येते.
ज्योतिष अशा कसोटींवर उत्तीर्ण होत नाही. त्यामुळे ते शास्त्र नाही. शास्त्र, विज्ञान यांचा पाठपुरावा करणे हे भारतीय घटनेने सांगितलेले प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे जे शास्त्र नाही त्यावर विश्वास न ठेवणे आणि त्याच्या सत्यासत्यतेची छाननी करणे हे माझे कर्तव्य आहे असे मी समजतो.