... पण जेव्हा हा विश्वास वापरून कुणी त्यावर उद्योग व्यवसाय सुरू करतो, त्या
व्यवसायाच्या भरभराटीसाठी सामूहिक मानसशास्त्राचा बिलंदर उपयोग करून घेतो,
आणि मुख्य म्हणजे आपल्या व्यवसायाला 'शास्त्र' असे शेपूट बिनदिक्कत लावून
टाकतो तेव्हा...
नेमका मुद्दा. माझा साधारण असेच काहीसे लिहिण्याचा विचार होता; पण जमले नाही.
. ज्योतिष 'व्यवसायात ओढले गेलेल्या' एका व्यक्तीने मला असाच मुद्दा सांगितला होता. त्याचे म्हणणे असे, की " .... जर मी माझ्याकडे आलेल्या लोकांना त्यांना 'हवे' तसे दिले नाही तर ते काही थांबणार नाहीत. ते दुसऱ्याकडे जातील. तसे होऊ नये म्हणून मी त्यांना अत्यंत अल्प पैसे घेऊन काय द्यायची ती उत्तरे देतो आणि त्यापासून परावृत्त करण्याचा मनापासून प्रयत्नही करतो. निदान दुसऱ्याने त्यांना लुबाडून त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून मला हे न पटूनही करावेसे वाटते..."