आजच्याच (दि.२८/१२)लोकसत्तेतील "जो न देखे रवी" या दैनिक सदरात डॉ. थत्ते म्हणतात
"धड ना इंग्रजी, धड ना हिंदी, धड ना मराठी अशी आजची आपली स्थिती आहे. इंग्रजीत "नो यार" वगैरे पूर्वी होते, हल्ली त्याची जागा विष्ठा( Shit ) आणि मैथुन( Fuck ) याबद्दलच्या इंग्रजी शब्दांनी व्यापली आहे आणि हे शब्द मुलीही सुलभतेने वापरतात. कारण त्याशिवाय त्यांया समूहात त्यांना स्थान मिळत नाही."
या सर्व गोष्टींना सांसारिक भांडणे किंवा पुरुषांनी बायकांशी बोलताना उच्चारण्याचे शब्द याचा कोठे संबंध येतो? कंसातील शब्द मी घातले आहेत, कारण डॉ. थत्ते यांना ते लिहावे असेसुद्धा वाटले नाही. हे जरी मराठी भाषेविषयी त्यांनी लिहिले आहे तरी सद्यस्थितीनिदर्शकही आहेच.