बरेच दिवस झाले मी लिहिलेले लिखाण अथवा प्रतिसादही मनोगतावर पाठवूनही जात नाहीत. खरे तर पुढील भाग तयार असून बरेच दिवस झाले आहेत . माझ्या संगणकाची चूक आहे की काय समजत नाही. जमल्यास उपाय कळवावा. अर्थातच हा प्रतिसाद दिसला तरच हे शक्य आहे. 
प्रशासकांनाही लिहून झाले आहे, पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. कारण कळत नाही. माझी स्वतःची पण चांगलीच अडचण होत आहे. हा प्रतिसाद जर दिसला तर मी नक्कीच कथेचा पुढचा म्हणजेच अंतिम भाग पाठवू शकेन. गैरसोईबद्दल क्षमस्व.