सर्व उत्तरदात्यांना मनापासून धन्यवाद!
प्रकाशा घाटपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच कुत्रा पाळणे हा एक वसा आहे. खूप जणांशी बोललो, जालावरून माहिती काढली व ह्या निष्कर्षावर पोचलो की हे आपल्याकडून होणार नाही. उगीच एका मुक्या प्राण्यावर अन्याय करायला नको.
पक्षी पाळण्याचा देखिल विचार केला. पण त्यांना कोंडून ठेवणे योग्या वाटले नाही. मला असे काही हवे होते ज्याने पाळलेल्या प्राण्याला आवश्यक असणारे नैसर्गिक वातावरण (थोड्याप्रमाणात तरी) मिळावे.
शेवटी माझी सांभाळण्याची तयारी (घरच्यांची सुद्धा), शेजाऱ्यांचा नको असलेला उपद्रव व माझी तीव्र इछछा ह्या सर्वांचा विचार करून मी माशांची पेटी (पाण्यातले, मधमाश्या नाही
) आणली. हा निर्णय खूपच चांगला निघाला. एक चांगला फिल्टर व योग्य प्रमाणात माशांना खाणे देणे एवढे केले तर जास्त काही करावे लागत नाही. १५-२० एकदा साधारण ६०% पाणी बदलले की झाले. ४-५ दिवस घर बंद करून गावाला गेले तरी हरकत नाही. आणि पाण्यात निवांत फिरणारे मासे बघण्याने वेळ ही छान जातो व ताण खूपच हलका होतो.