हिंदी अर्थाने वापरलेल्या 'तंग'ऐवजी महेश म्हणतात त्याप्रमाणे 'त्रस्त' हा शब्द बरा वाटतो. तसेच, द्विपदीच्या दुसऱ्या ओळीत "आरसे संपात गेले" हेही जरा खटकते. संपावर गेले असे म्हणायचे असल्यास वृत्ताशी तडजोड म्हणून त्यातल्या त्यात 'संपास गेले' चालून जाईल असे वाटते. "संपात गेले" हे लढाईत गेले, अपघातात गेले ह्या धरतीवर त्रस्त होऊन संप करून मेले असे सुचवते.