ती जुनी चालेल मदिरा
आण नक्षीदार पेले
हा शेर सरळ शब्दार्थानेही घेता येतो, व एखादी जुनी झालेली वस्तू ( किंवा व्यक्तीही ) आकर्षक वेष्टनात (/कपड्यात, रंगरंगोटी करून) सुबक रीतीने बांधून खपवावी/खपवता येते ह्या रूपकार्थानेही. परंतु रूपकासाठी योजलेले मदिरेचे उपमानच रूपकाला मारक ठरते आहे. नक्षीदार पेल्यातून दिली की जुनी मदिराही चालून जाईल असा अर्थ निघतोय. परंतु मदिरेच्या बाबतीत ती जितकी जुनी तितकी अधिक चांगली मानली जाते. त्यामुळे शेराच्या (मी लावलेल्या. चू. भू. दे. घे. ) दोन्ही अर्थांना बाधा पोहोचते आहे. "जुनी"ऐवजी 'नवी' हा शब्द घेतला तर शब्दार्थ बरोबर होतो, पण रूपक उलट्या दिशेने गडबडते - (मदिरा सोडून अन्य कोठलीही) नवी वस्तू/तरूण व्यक्ती सहसा टवटवीत, आकर्षक, उठावदार इत्यादी असल्यामुळे "नक्षीदार पेल्यां"ची आवश्यकता नसते.