रास्त मुद्दा. शाश्वती नाही. परंतु, असा प्रश्न दाक्षिणात्य वाहिन्यांना पडलेला नाही. त्यांनी केलेले हिंदीचे त्यांच्या भाषेतील भाषांतर वाईटही असू शकेल. तरीही,  ते लोक त्यांच्याच भाषेत कार्यक्रम पाहणे पसंत करतात. हिंदीत कार्यक्रमाचे मराठी भाषांतर वाईट आहे, म्हणून हिंदी कार्यक्रम पाहावेत असा विचार किती टक्के मराठी लोक करतील आणि भाषांतर वाईट  असले तरीही चालेल पण आम्ही मराठीतच कार्यक्रम पाहू, असा विचार किती टक्के मराठी लोक करतील, असा प्रश्नयुक्त मुद्दा उपस्थित होत आहे.