प्रसंगानुरूप मराठी वापरावयाचे झाल्यास शुद्ध-अशुद्ध पाहण्यापेक्षा योग्य-अयोग्य पाहणे उचित होईल. (मूळ उद्देश हा, मराठीत भेसळ होऊ नये हा आहे. भाषांतरात्तिल सर्व शब्द मराठीतलेच हवेत. आणि त्या शब्दांना मराठीतलाच पण अभिप्रेत तो अर्थ असायला हवा.)
म्हणजे असं बघाः
"कवा" हा शब्द व्याकरणदृष्ट्या "अशुद्ध" पण एखादा ग्रामीण प्रसंग अथवा संवाद असेल तर हा शब्द अशुद्ध असूनही "योग्य" ह्या सदरात मोडल्यामुळे तो वापरणं रास्त होईल, नाही का?
अर्थात हेही सत्यच आहे की प्रांताप्रांतानुसार हे ग्रामीण मराठी बदलू शकतं. म्हाणजे हाच "कवा" कोकणात "कदवा" होतो.
("म्हैस- पु ल -- काय डायवरसाहेब, गाडी हलनार कदवा".... )
पण त्यानुसार आपल्याला मराठी वापरावी लागेल. म्हणजे इथपर्यंत आपल्याला माहिती असावी लागेल.  फक्त "योग्य" मराठी असावी म्हणजे झालं. त्यात "हिंदीची" मिलावट.... आपलं भेसळ नको.
...........कदाचित, मला काय म्हणायचं आहे ते मला सांगता आलं नसेल पण...... प्रयत्न केलाय.. ‍  जरा अजून चर्चा/विचार करावा लागेल....