संस्कृत ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे म्हणजे त्या भाषांमधील बरेचसे शब्द, व्याकरणाचे नियम, रुपे इ ही मूळ संस्कृत सारखी आहेत.. ‍जसे आईचे बरेचसे गुण मुलीत येतात व काही तिचे स्वतःचेही असतात... त्या अर्थी! 
शुद्ध भाषा तर ती आहेच... त्यात काही प्रवादच नाही.
आणि गीर्वाण भारतीही आहेच... देवांची भाषा....

तसेच संस्कृत हि खरेच काँप्युटर फ्रेंडली भाषा आहे... कारण तिचे व्याकरणाचे ठाम व 'टॅब्युलर ' नियम! कुठलाही शब्द कसा चालेल हे नक्की आहे... तो तस्साच चालणार... त्यात बदल नाही. त्यामुळे आपण संगणकाला एकदा सांगितलेले नियम चालतात. इव्हन मराठीतही असे नाही. "माझे तुमच्या कडे पाच रुपये आहेत".. चा अर्थ "तुम्ही मला पाच रु देणं लागता" असाही होतो आणि "मी तुम्हाला पाच रु देणं लागतो" असाही!
भाषांची पिलावळ वगैरे वाचून कसेसेच वाटले. काय हे समज व काय विचार!