संस्कृत संगणकासाठी खूप अनुकूल भाषा आहे

हे मत माझ्या लहानपणी वाचले/ऐकले होते.  एल. एस. वाकणकर हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लिपीतज्ञ होते. त्यांनी संस्कृत - मराठीसह सर्व भारतीय भाषांचे (लिप्यांचे) संगणकीकरण केले. ध्वन्यार्थक असल्याने देवनागरी लिपी आणि संस्कृत भाषा या संगणकीकरणासाठी अनुकूल आहेत असे त्यांचे मत होते आणि एक लिपीतज्ञ म्हणून ते योग्यच होते. संस्कृत भाषा काँप्युटर लॅन्ग्वेजेस लिहिण्यासाठी जास्त उपयुक्त आहे असे त्यांचे मत अर्थातच नव्हते. आता काही लोक अज्ञानामुळे त्यांच्या मताचा स्वतःला सोयीचा अर्थ लावत असतील तर तो दोष त्यांचा नाही.

वाकणकरांबद्दल थोडीशी माहिती इथे आहे.

विनायक