वाकणकरांनी लिप्यांचे संगणकीकरण केले म्हणजे, बहुधा, भारतीय लिप्या संगणकावर उमटवण्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार केले, असावे (यासाठी की लिपी आणि संगणक दोन्ही विषयांमध्ये मी अडाणी आहे).  वाकणकरांचे सहकारी श्री. मुदूर यांचा एक  शोधनिबंध इथे आहे.  तुमच्यासारख्या संगणकतज्ञाला तो निबंध चांगल्या प्रकारे समजू शकेल. निबंधाच्या संदर्भसूचीमध्ये पहिला आणि पाचवा, असे दोन संदर्भ श्री. वाकणकर आणि श्री. मुदूर यांनी लिहिलेल्या देवनागरी लिपीच्या संगणकीकरणाबद्दलचे आहेत.

विनायक