साधारणपणे ८० च्या दशकाच्या मध्यापासून तीन गोष्टींचा मारा भारतीय मध्यमवर्गावर सातत्याने केला गेला. ह्या तीनही गोष्टी तद्दन बनावट होत्या.  त्या अशा -
१.  नॉस्ट्रॅडेमसचे भारत महासत्ता होणार हे भाकीत.
२.  मेकॉलेचे भारतीय संस्कृतीचे भलावण करणारे भाषण.
३. संस्कृत ही संगणकाकरिता अत्यंत योग्य असल्याचा शोध.

ह्या तीनही गोष्टी वरकरणी "खुळचटाचे काम" वाटल्या तरी त्यामागे एक सूत्र असल्याचे जाणवते.