"नैनं छिंद्ंती शस्त्राणी" नंतर पूर्णविराम नाही. तरी पण मान्य कि उदाहरण करता मी जे वाक्य घेतले (किंवा दोन वाक्ये घेतली) ती निवड चुकली. दुसरे वाक्य घेऊन हा धागा पुढे चालू ठेवता येईल. पण त्याची गरज नसावी. कारण मूळ मुद्दा असा होता कि संस्कृत संगणका करता जास्त उपयुक्त आहे का. तो आता मागे पडला आहे. प्रत्यक्षात संस्कृत अतिशय व्याकरणशुद्ध भाषा आहे व त्यात शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नाही ही
निर्विवाद सत्य गोष्ट आहे.
या संदर्भात तीन प्रश्न.
१ शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नाही हे काही उदाहरणे देऊन कोणी स्पष्ट करून दाखवेल का?
२ कोणतीही भाषा अतिशय व्याकरणशुद्ध असणे म्हणजे नेमके काय, हे कोणी समजावून सांगेल का? व्याकरणशुद्ध वाक्ये विरुद्ध व्याकरणअशुद्ध वाक्ये अशी काही उदाहरणे घेऊन समजावून सांगेल का?
३ ज्या भाषेत शब्दांची कशीही जुळणी केली तरी अर्थ बदलत नसेल, तर याचा अर्थ त्या भाषेत व्याक्रणाचे नियम शिथील आहेत, का स्ट्रिक्ट आहेत ?