चर्चाविषय सुरू करतानाच श्री. चिन्मय धारुरकर यांच्या संस्कृतला इतर भाषांची जननी समजण्याच्या मुद्द्याला मी महत्त्व दिले होते. आणी त्याचाच पुनरुद्धार मी माझ्या नतरच्या प्रतिसादात केला आहे. आपल्याइतके संस्कृत व संगणक या दोन्ही विषयांचे ज्ञान मला आहे असाही माझा दावा नाही. श्री चिन्मय धारुरकर यांच्याशी संपर्क साधता येत नाही म्हणून या विषयावर निदान आपल्याला जे वाटते  तसेच आपल्यासारख्या तज्ञाला  वाटते किंवा कसे  हे जाणून घेणे हे चर्चाविषयाचे प्रयोजन.  संस्कृत भाषा व्याकरणशुद्ध भाषा आहे हे जे मी चर्चेच्या ओघात नमूद केले त्याचा आपल्या प्रतिसादातील कोणत्याच भागाशी संबंध नाही आणि हे माझे मत कदाचित सुसंगत नसेलही. तरी कृपया आपला संवाद श्री चिन्मय धारूरकर यांच्या लेखातील मताशी संबंधित असावा एवढीच नम्र अपेक्षा!