१) @ सुनील  : आपल्या मुद्दा १ आणि २ शी सहमत. तिसऱ्या मुद्द्याविषयी थोडासा गोंधळ आहे. मेकॉलेने भारतीय संस्कृतीची भलामण केली हा गैरसमज आहे असेच आजपर्यंतच्या वाचनात आहे. ती भलामण खोटी होती, एक देखावा होता, त्याचे खरे हेतू वेगळेच होते, त्याच्या मनात 'पाप' होते आणि आपण उगाचच मेकॉलेला भाव देतो असेच गेल्या काही वर्षांतल्या वाचनात आले.  दि. २६ -१-२०१४ च्या लोकसत्तामध्ये ' मेकॉले : काल आणि आज' या पुस्तकाचे परीक्षण आले आहे. त्यात या पुस्तकात 'मेकॉलेच्या मारेकऱ्यांचा' पुराव्यांनिशी समाचार घेतला आहे असे लिहिले  आहे. ब्रिटिश पार्लमेंट मधल्या ज्या भाषणाचा हवाला देऊन मेकॉले हा भारतीयसंस्कृतिविरोधी होता असा मतलबी प्रचार केला जातो  ते १८३५ मधले भाषणच बनावट आहे कारण त्याची नोंद पार्लमेंटच्या इतिवृत्तात नाही. शिवाय या काळात मेकॉले इंग्लंडमध्ये नव्हतेच असेही या पुस्तकात सिद्ध केले आहे असे समीक्षणात म्हटले आहे. त्यामुळे मेकॉलेने भारतीय संस्कृतीची भलामण केली  हे खरेच असावे. आपल्यालाही असेच म्हणायचे होते काय?