जागा संपली वाटते. शेवटच्या काही ओळी लिहिता आल्या नाहीत. त्या अश्या :   पाणिनीने जर आपली अष्टाध्यायी कुठे लिहून ठेवली होती असेलच तर ती अरेमाइक किंवा खरोष्ठी लिपीत असावी.  गंधारप्रदेशात याच लिप्या प्रचलित होत्या. ब्राह्मीतून देवनागरीची उत्क्रांती ही फार पुढची घटना आहे. काही लोक देवनागरीला गीर्वाणभाषेची लिपी म्हणून श्रेष्ठ आणि पवित्र मानतात म्हणून हे  लिहिले. "स्थूलमानाने असे म्हणता येईल की भारतीय द्वीपकल्पातील बोलींमध्ये दोन समांतर  प्रवाह आहेत,  संस्कृत आणि प्राकृत . वेगवेगळ्या टप्प्यांवर दोघांचा प्रभाव एकमेकांवर पदला आहे. संस्कृत म्हणजे अर्थात रीफाइंड, संस्कारित. प्राकृत म्हणजे सहज, नैसर्गिक. प्राकृत भाषा या अशिक्षित अशा फार मोठ्या बहुजनसमूहाच्या बोली होत्या आणि संस्कृतच्या बरोबर (साइड बाय साइड) अस्तित्वात होत्या. त्यांचे मूळ कदाचित टोळ्यांमध्ये (ट्राइबल ग्रूप्स)  बोलल्या जाणाऱ्या भाषेत असावे आणि संस्कृतच्या सान्निध्यात राहून त्यांनी विकास साधला असावा. "     -टी. एस. शर्मा