हा लेख माझ्या वाचनात आत्ता आला त्यामुळे लिहिता आलं नाही. त्यामुळे लिहायला उशीर झाला आहे . पण हा विषय न संपणारा आहे. सगळेच योग हे आधी का समजत नाहीत , याचे आश्च्रर्य वाटते. मीही या शास्त्राचा अभ्यास केला आहे. माझ्या मते कोणतीही कुंडली माणसाची
वृत्ती दाखवू शकते, भविष्यच काय , भूतकाळ देखील अचूक सांगू शकत नाही. कदाचित हे शास्त्र( किंवा मी ह्याला षोक म्हणेन ,) फक्त माणूस डबघाईला आल्यावर थोडेफार उत्तेजन देण्यासाठी निर्माण झाले आहे. तेही खोटे उत्तेजनच बहुधा द्यावे लागते. तसेच याचा अभ्यास करणारा आणि दुसऱ्याच्या आयुष्यातले योग डोकावून पाहणाऱ्याला या पापाची किंमत द्यावी लागते. कारण दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावण्याचा तुम्हाला अधिकार नाही , तसेच त्याला उपाय सांगण्याचाही अधिकार नाही, कारण त्याने अमुक एक प्रकारचे भोग भोगावेत असे जर ठरले असेल (म्हणजे प्रीडेस्टींड
असेल) तर ते भोगायला लागू नयेत म्हणून उपाय सांगणारे आपण कोण ? ही एक प्रकारची परमेश्वरी राज्यातील किंवा निसर्गाच्या राज्यातील(परमेश्वर मानित नसाल तर , निसर्ग) गुन्हेगारीच आहे. मग त्याची किंमत सांगणाऱ्याकडूनही वसूल केली जाणे यात चूक नाही.माझ्या मते बहुतेक ज्योतिषांना काही ना काही तरी विशेष वैयक्तिक अडचण निर्माण झालेली असते. कदाचित मूळ ज्योतिषशास्त्र काहीतरी वेगळं असावं , आम्ही शिकतो ते खोटं शास्त्र असावं. त्यामुळे कितीही आकडेमोड केली तरी अनुमान बरोबर येण्याची शक्यता कंमीत कमी असते . त्यामुळे मी या शास्त्राला "काबडमो" असे म्हणतो. म्ह्णजे "कावळा बसायला आणि डहाळी मोडायला" एक वेळ येणं.
लेखिकेचा या विषयावरचा अभ्यास बराच असावा असे दिसते. पण तिने हा विचार केलेला दिसत नाही की या शास्त्राचा अभ्यास करण्याची गरज काय आहे ? किंवा हे शास्त्र जर एवढे परिपूर्ण आहे तर ते दैनंदिन जीवनात सर्रास का वापरले जात नाही ?