ही ऋग्वेदिक संस्कृतहून वेगळी भाषा आहे.

'इतिहास'पासून जर 'ऐतिहासिक', 'परंपरा'पासून जर 'पारंपरिक', फार कशाला, 'हृद्'पासून जर 'हार्दिक', तर मग 'ऋग्वेद'पासून 'ऋग्वेदिक' कसे? 'आर्ग्वेदिक' का नाही? ('ऋषि'पासून 'आर्ष', तद्वत?)

(त्या गुण-वृद्धी वगैरे भानगडींमध्ये आणि या ठिकाणी लागू पडणाऱ्या नेमक्या नियमाबद्दल माझ्या मनात नेहमी गोंधळ उद्भवत असल्याकारणाने उदाहरणां-दाखल्यांतून शंका विचारलेली आहे. क्षमस्व.)