'इतिहास'पासून जर 'ऐतिहासिक', 'परंपरा'पासून जर 'पारंपरिक', फार कशाला, 'हृद'पासून जर 'हार्दिक', तर मग 'ऋग्वेद'पासून 'ऋग्वेदिक' कसे? 'आर्ग्वेदिक' का नाही? ('ऋषि'पासून 'आर्ष', तद्वत? )

हा युक्तिवाद योग्य वाटतो; मात्र तसा शब्द निदान आंतरजालावर मिळाला नाही. कदाचित एखाद्या संस्कृत संकेतस्थळावर हा प्रश्न विचारलात तर कोणी जाणकार उत्तर देऊ शकेल असे वाटते.

त्याव्यतिरिक्त 'ऋग्वेदीय' असेही म्हणता येईल असे वाटते.