"ऋग्वेदिक" असा शब्द अस्तित्त्वात नाही म्हणून तर त्यावर (चर्चा विषय नसूनही) चर्चा चालली आहे. त्यासाठी इंग्रजी शब्दाचा हवाला द्यावयाची आवश्यकता नाही. ते मान्य केले तर "सर्वस्यचाहं हृदि सन्निविष्टो ---" असा गीतेत श्लोक आहे म्हणून त्याकाळी लोक चहा पीत होते कारण चाह चेच पुढे चहा असे रूप झाले हा निष्कर्षही बरोबर आहे असे कोणी म्हणाल्यास तेही मान्य करावे लागेल. "वैदिक " हा शब्द संस्कृत भाषेत अस्तित्त्वात आहेच.तोच मराठीत आला आहे.  उलट इंग्रजीतील "वेदिक"  हा शब्दच या "वैदिक"चे अपभ्रष्ट  रूप आहे. वैदिक, ऐतिहासिक असे इक प्रत्यय लागल्यामुळे मूळ शब्दात बदल होतो. आणखी एक उदाहरण साप्ताहिक (सप्ताहपासून) तसा उल्लेखही एका प्रतिसादात झाला आहे. ऋग्वेदिक असा अस्तित्त्वात नसलेला शब्द ऋग्वेदकालीन या अर्थी एका प्रतिसादात वापरला गेला आहे. व तो वापर चुकीचा आहे असे खुद्द प्रतिसादलेखकाने मान्य केले आहे. इत्यलं ।