कांदळकर साहेब,

उत्तम विषय निवडला आहेत. त्याखातर प्रथम हार्दिक अभिनंदन!

सुंदर मांडणी करत आहात. सुयोग्य पर्यायी शब्दांची निवड करत आहात. दोन्हीही लेख मला बेहद्द आवडले.

मध्यंतरी कर्करोगाच्या परिचयार्थ काही पुस्तिकांचा अनुवाद करत असतांना मला अशाच अनेक शब्दांचा सामना करावा लागलेला होता.

त्यावेळी मला सुचलेले पर्यायी मराठी शब्द खाली देत आहे. कदाचित उपयोग होऊ शकेल...

जीन्स जनुका
ग्लुकोज = शाक-शर्करा, C६H१२O६
हलाईड= क्षारजनिल
हॅलोजन = क्षारजन
हायड्रोक्लोरिक ऍसिड = तोय-क्लोरिल-आम्ल
हाड्रॉक्साईड = तोय-प्राणिल
आयोडाईड = आयोडिल
लॅक्टोज = दुग्धशर्करा 
मॅक्रोमॉलिक्यूल = बृहद्रेणू; निष्प्राण-शर्करा-गर्भकाम्ल, शर्करा-गर्भकाम्ल आणि प्रथिने
मेटॅस्टॅसिस = स्थलांतरण
मिनरल्स = क्षार
नायट्रिक ऍसिड = नत्राम्ल
न्युक्लिक ऍसिड = गर्भकाम्ल (न्युक्लिकाम्ल)
न्युक्लिओबेस = गर्भकाधार
ऑन्कोजिन्स = अर्बुद-जनक-जनुका
ऑक्साईड = प्राणिल
फॉस्फेट = स्फुरद-प्राणिल
पॉली-सॅखराईडस = बहु-रेण्वीय शर्करा
प्रोस्टेट = शुक्राशय पिंड
प्रोटीन = प्रथिन
प्युरीन  = शुद्धक, C५H४N४
रायबो-न्युक्लिक-ऍसिड = शर्करा-गर्भकाम्ल. मोठ्या-जैव-रेणूंचे एक, सर्वव्यापी कुटुंबच असते जे जनुकांचे संकेत-अंकन, संकेत-उकल, नियमन आणि अभिव्यक्ती इत्यादी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावत असते.
रायबोज = शर्करा (रायबोज) हे एक सेंद्रिय संयुग असते, C५H१०O५. पंचकर्ब शर्करा; इतर शर्करा निर्मितीसाठी जिचे तोयीकरण होत नाही. 
सॅराईडस = एकल-रेणू-शर्करा
सुक्रोज = ईक्षुशर्करा, ऊसशर्करा, फलशर्करा व शाकशर्करा यांच्या बंधनाने तयार होणारी शर्करा
शुगर = ईक्षुशर्करा, ऊसशर्करा
सल्फेट = गंधक-प्राणिल
सल्फाईड = गंधिल
सल्फ्युरिक ऍसिड = गंधकाम्ल
सिंड्रोम्स = एकत्रित लक्षणे, लक्षणसमूह
थेरपी = उपचारपद्धती
ट्रिटमेंट = उपचार
ट्युमर सप्रेसर जिन्स = अर्बुद-दमनक-जनुका
युरिक ऍसिड = मूत्राम्ल