धन्यवाद. पहिल्याच मिनिटात  रेल, जीपीएस, जपानीज एन्सिफिलायटीस हे शब्द ऐकायला मिळाले.  आणि ही प्रगती या बातम्या केवळ एक कुतुहल किंवा भाषेचा वारसा जपायचा, म्हणून असताना. ठेवणीतले फोटो आपण अधून मधून आठवण म्हणून काढून बघतो तसे. जर संस्कृत एका मोठ्या लोकसमूहा कडून रोजच्या वापरात  असती, तर तीत आणखीन किती तरी बदल झाले असते.

कल्पना करा कि मागच्या शंभर पिढ्यांतील माणसे जिवंत झाली आहेत व त्यांचे एक सम्मेलन भरले आहे. एक पीढी म्हणजे साधारण ३० वर्षे अवधी धरला तर  शंभर पिढ्या म्हणजे ३००० वर्षे. या सम्मेलनात पिढी-१ ची व्यक्ती पिढी-१०० च्या व्यक्ती बरोबर संवाद साधू शकणार नाही.  कारण त्यांची भाषा वरकरणी जरी तीच असली तरी त्यात इतके बदल झालेले असतील कि पिढी-१ च्या व्यक्तीचे अनेक शब्द, व ते वापरण्याची  पद्धत, पिढी-१०० च्या व्यक्तीला अजिबात कळणार नाही.

पण त्यांना पिढी अनुसार क्रमांकाने रांगेत उभे केले, व असा नियम केला कि प्रत्येक पिढीच्या व्यक्तीने फक्त आपल्या डावीकडच्या किंवा उजवी कडच्या व्यक्ती बरोबरच बोलायचे, तर पिढी-१ च्या व्यक्तीचे म्हणणे पिढी-१०० च्या व्यक्ती पर्यंत सहज पोहोचेल. पिढी-१ च्या व्यक्तीचे बोलणे   पिढी-२ च्या व्यक्तीला कळेल; पिढी-२ च्या व्यक्तीचे बोलणे पिढी-३ च्या व्यक्तील कळेल; . . . .पिढी-३५ च्या व्यक्तीचे बोलणे पिढी-३६ च्या व्यक्तीला कळेल; . . . इत्यादी. वाक्य जसजसे पुढे सरकेल त्यात हळू हळू बदल होत राहतील. काही पिढ्यां नंतर मूळ वाक्य इतके बदलेले असेल कि ते जर तसेच्या तसे जर परत पिढी-१ च्या व्यक्ती कडे नेले तर तिला ते अजिबात ओळखू येणार नाही.

भाषेचा अभ्यास दोन पातळी वर असतो. एक म्हणजे ती भाषा शिकणे - त्या भाषेचा शब्द संग्रह, व्याक्रण, त्या भाषेतील काव्य-साहित्य, इत्यादीचा अभ्यास करणे. दुसरे म्हणजे ती भाषा शिकून मग त्या वर भाषा विज्ञानाच्या दृष्टीने विचार करणे. त्या भाषेत जे काही आहे त्या ऐवजी काही दुसरे असते तर जास्त सोपे झाले असते का; काही विशेष चांगले आही का तसेच काही अनावश्यक / काही तृटी आहेत का; इत्यादी.  अभ्यास पहिल्या पातळी वरच सीमीत राहिला तर "संस्कृत तो बाळ्या, इंग्रजी ते कार्ट" असा ग्रह (का गंड ?) होण्याचा संभव असतो. यातूनच "संगणका करता संस्कृत ही सगळ्यात चांगली भाषा आहे" असले भ्रम उगवतात.

दुसर्या पातळी वर गेल कि "डोळे उघडतात". याचे उत्तम उदाहरण म्हणजे - मराठीत व इंग्रजीत नपुसकलिंग आहे. तो, ती, ते / He, She, It.  पण हिंदीत नपुसकलिंग हा प्रकारच नाही !! फक्त पुल्लिंग किंवा स्त्रीलिंग. याने हिंदी चे काय अडले ? नपुसकलिंग ही संकल्पनाच नसल्याने रोजच्या बोल-चालीत हिंदी वापरणार्यांना काही त्रास होतो ? हिंदीतील साहित्य-काव्य-नाट्य काही प्रकारे उणे पडते ? किंवा मराठीत व इंग्रजीत नपुसकलिंग असल्याने त्यांचे साहित्य-काव्य-नाट्य हिंदी पेक्षा श्रेष्ठ होते ? व या सर्वाचे  उत्तर जर "नाही" असेच असेल, तर मग  मराठीत व इंग्रजीत नपुसकलिंग ही संकल्पना फालतू आहे, व काढून टाकल्यास  भाषा काहीही उणे होता जास्त सोपी होईल का ? हाच विचार जरा
पुढे नेऊन, संस्कृत चे व्याक्रण नियम जे जसे आहेत त्यांची टिमकी वाजविण्या पेक्षा ते शिथील करून सोपे केल्यास  काही फायदा होईल का?

दुसरा धागा सुरु करण्यास चांगला विषय आहे.