अगदी खरे आहे हो. तुमचे म्हणणे अगदी पटते. माझा नातू सारखा ट्विटरवर टिवटिवत असतो तो मला हेच म्हणाला. व्याकरण, शुद्धलेखनच काय पण भाषेला शब्दांचीही गरज नाही. दोन चार चित्रे चिकटवून दिली की संदेश जातो. आता तुमच्याच प्रतिसादातले
कार्ट... भ्रम... डोळे उघडतात.... काय अडले... काही त्रास होतो... संकल्पना फालतू... टिमकी... फायदा
एवढेच शब्द वाचले तरी अर्थ आणि उद्देश समजतोच की. वेळ वाचतो आणि चांगला परिणामही होतो. शिवाय लिहायला सोपे.
नातवाला हे दाखवायला पाहिजे. धन्यवाद.