आपल्याला पडलेला प्रश्न मलाही पडला. खरंतर दाक्षिणात्य भाषा ह्या संस्कृतच्या पायावर उभ्या आहेत असे ते अभिमानाने सांगतात,
पण संस्कृतमध्ये कुठेही "त" चा "थ" केलेला दिसत नाही. असे असतांना केवळ आपले वेगळे पण टिकवण्यासाठी ते असे करीत असावेत असे वाटते. अन्यथा "मूर्ती" चं मूरथी " किंवा "सरस्वती " च "सरस्वथी " करण्याची गरजच काय ? असो. एक अनुभव सांगतो. एकदा एका बालरोग तज्ञाकडे एक दाक्षिणात्य बाई आपल्या लहान मुलाला घेऊन डॉक्टरानी बोलावण्याची वाट पाहत बसली होती. मुलगा गंमत म्हणून संडे ते सॅटरडे वारांची नावं घेत होता. तो "फ्रायडेला " फ्रायडेच म्हणाला. पण त्याच्या आईने मात्र लगेच त्याला सांगितले, " नो नो नॉट फ्रायडे, इट इज ' फ्राईडे ' " ई चा उच्चार लांबवून पटकन डे अक्षर ऱ्हस्व म्हणावे. म्हणजे लक्षात येईल.
याच्यामागे मला तरी वेगळेपणा शिवाय दुसरा हेतू दिसत नाही.
हल्ली आपल्याकडे सुद्धा, ज्या नामांची अनेक वचनं वेगळी होत नाहीत त्यांची अनेकवचनं करून लिहिली जातात.
उदा : मूर्ती : मूर्त्या
कागद : कागदं.
दगड : दगडं.
केस : केसं
उंदिर : उंदरं.
अर्थातच ही यादी मोठी होऊ शकेल. याला काय करणार.?