मुस्लीम असून मराठी बोलता येणे ही आश्चर्यकारक गोष्ट   ही मराठी भाषकांचीच (मुस्लिमांव्यतिरिक्त) गैरसमजूत आहे. प्रत्यक्षात ज्या प्रदेशात राहतो तेथील भाषा बोलता येणे हे क्रमप्राप्तच आहे. मी सोलापुरात राहिलो तेव्हां तेथील काही मुस्लिम कन्नड भाषा तर काही मराठी अस्खलित बोलत होते. आणी त्याचे आम्हास आश्चर्य वाटत नसे. माझे सगळे मुस्लिम दोस्त माझ्याशी मराठीतच व्यवस्थित बोलतात.आपणही त्यांच्याशी मुद्दाम हिंदीत बोलून त्यांच्यात वेगळेपणाची भावना पैदा करणे ही चूकच आहे.