मूळात तमिळ भाषेत "थ" हा उच्चारच नाही. "त" आणि ट" आहेत. ह्या दोन्ही उच्चारात फरक करण्यासाठी ते "ट" साठी T आणि "त" साठी Th असे स्पेलिंग वापरतात.

म्हणून ते जेव्हा Geetha असे लिहितात तेव्हा त्यांना गीता हा उच्चार अभिप्रेत असतो. (आपण गीथा म्हणतो कारण मराठीतील रोमन लिपेचे कन्वेंशन वेगळे आहे). Geeta लिहिले तर त्याचा उच्चार ते गीटा असा करतील.

तेव्हा इथे कोण बरोबर आणि कोण चूक हा प्रश्नच निर्माण होत नाही.

(जर्मनमध्ये J चा उच्चार "य" असा होतो. म्हणून काय जर्मनांना चूक म्हणणार? )