त या उच्चारासाठी आपण इंग्लिश टी अक्षर वापरतो हे तरी बरोबर आहे  काय?  इंग्लिश टी मधून 'त' हा ध्वनी ऐकू येतो काय? पण मराठी 'त' साठी इंग्लिश टी वापरावी अशी  आपली धारणा आणि प्रथा आहे म्हणून आपण ते करतो. दाक्षिणात्य लोक 'त' या उच्चारासाठी 'टी एच' वापरतात आणि त्याचा  'त' असाच उच्चार करतात ही त्यांची त्यांची धारणा/प्रथा/संकेत आहे. त्यांच्या उच्चारसंकेतानुसार योग्य असलेले लेखन आपण आपल्या संकेतानुसार वाचावे आणि ते चूक ठरवावे हे योग्य नाही.