मुस्लीम असून मराठी बोलता येणे ही आश्चर्यकारक गोष्ट ही मराठी भाषकांचीच (मुस्लिमांव्यतिरिक्त) गैरसमजूत आहे.

हे विधान ठीकच वाटते.

मात्र,

प्रत्यक्षात ज्या प्रदेशात राहतो तेथील भाषा बोलता येणे हे क्रमप्राप्तच आहे.

या कारणमीमांसेबद्दल किंचित साशंक आहे.

रेव्हरंड नारायण वामन टिळक (किंवा लक्ष्मीबाई टिळकसुद्धा)  जे सुंदर मराठी बोलत वा लिहीत, नव्हे, त्यांची मराठी भाषा अस्खलित असणे जे क्रमप्राप्त होते, ते केवळ ती दोघे महाराष्ट्रात राहिल्यामुळे झाले असावे, की त्यामागे काही इतर कारणही असू शकेल?