सुनील आणि लतापुष्पा यांच्या  प्रतिसादांमुळे माझा गोंधळ कमी झाला. 
     जावळे यांचा दुवा नीट उघडत नाही. 
     त्यांचे चूक आणि आपले बरोबर असा दावा कदाचित् कोणाचाही नसावा.
     हा फरक नक्की कधी घडून आला, या फरकाचे कर्ते कोण, त्यावेळी कशी चर्चा झाली होती हे जाणून घेण्याची इच्छा होती. त्याचबरोबर, अशा फरकामुळे कागदपत्रांवरील नोंदीमध्ये तफावत येणे व त्यावरून वादावादी  होणे असे प्रकार भारतात घडले आहेत का, हेही जाणून घेण्याची इच्छा होती.विशेषतः दाक्षिणात्य उत्तर भारतात येतात तेव्हा.  उदा. आपल्याकडे सई हे नाव एस ए ई ई अशा रीतीने पालकांनी लिहायला सुरुवात केली असेल व सर्व उर्वरीत समाज खातरजमा करून न घेता एस ए आय असे लिहितो तेव्हाही गोंधळ होतो. 
      भारतात यासंदर्भात एकावाक्यता येऊ शकते का, यावरही चर्चा झाल्यास उत्तम.

निरनिराळ्या  लेखनशैलीच्या व स्वभावाच्या सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.