माझे मत आहे की आपल्या पालकांना कुठल्याही कारणासाठी शक्यतोवर अंतर देउ नये. परदेषात जाताना त्यांची तयारी असल्यास त्यांना सोबत न्यावे. लग्न कार्यावर, पर्यटनावर, हौशी मौजीवर थोडा कमी खर्च झाला तरी चालेल पण पालकांचा औषधौपचार नीट करावा.
माझा या बाबत अनुभव जो काही आला तो काही मित्रांचा, नातेवाइकांचा आहे. संधी असून देखील नवऱ्याने परदेशाचा रस्ता कधी न घेतल्यामुळे आणि मुलगा अजून लहान असल्यामुळे स्वानुभव असा नाही.