कारण शिक्षणासाठी आजकाल अमेरिकेत जाण्याची फॅशन आहे. एकदा तिकडे गेलेली मुलं सहसा परत येत नाहीत असं बघण्यात आलं आहे. अगदी दोनच वर्षांसाठी गेलेले तिकडेच स्थायिक होतात हे बघितलं आहे. म्हणजे कंपनीच्या कामासाठी जाणारे तिकडे गेले की नोकरी बदलून तिकडेच राहणं पसंत करतात. याच्या कारणांचा खरंच शोध घ्यायला हवा. 

मला वाटतं की कदाचित याला एक कारण असं असेल की एकदा तिकडे गेल्यावर तिकडच्या सुखसोयी अनुभवल्यावर परत इकडे यायला मन तयार होत नाही. उदा. तिकडे लाईट जात नाहीत असं ऐकून आहे. आपल्याकडे तर लाईट जाण्याचं प्रमाण अतिरेकी आहे. यासारखीच आणखीही काही कारणं असतील. 
नीताताई
तुम्ही वर  दिलेली कारणे खरी आहेतच. पण माझ्या मते सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कर्ज.  आजकाल बरीच मध्यमवर्गीय मुले शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्यासाठी ३०-४० (कदाचित जास्तही) लाखांचे कर्ज घेतात. म्हणजे कर्ज पालक काढतात पण परतफेड मुले शिक्षण झाल्यावर नोकरीतल्या पगारातून करतील अशी अपेक्षा असते. अमेरिकेत डॉलर्समध्ये मिळणारा पगार भारतातल्यापेक्षा जास्त असतो त्यामुळे कर्जफेड करणे सोपे जाते. ते होऊन आईवडिलांना मदत म्हणून थोडे पैसेही जास्त पाठवता येतात.  हा मुद्दाही महत्त्वाचा आहे असे वाटते.
विनायक