"मुले परदेशी गेल्या वर" हे प्रश्नचे स्वरुप अत्यंत संकुचित आहे, व फसवे पण आहे. संकुचित अश्या करता कि मुले भारतातच असली तरी तीच समस्या येवू शकते; आणि फसवे अश्या करता कारण मुले परदेशी आहेत म्हंटल्या वर प्रश्नचे मूळ कारण सोडून "परदेशात ? कशाला ? पैसा ? सुखी जीवनची चटक, चंगळवाद, भोगवादी संस्कृती, आई-वडिलांना विसरले" वगैरे अनंत फाटे फुटतात, जे अप्रस्तुत आहेत.
अएलोपथी उपचार पद्धतीने आयुष्य खूप लांबू शकते. यातून अनेक समस्या निर्माण होतात. माझ्या माहीतीतील काही कुटुंबांच्या वरून दिलेल्या खालील काही गोष्टी वर विचार करां
१: आई ८८, वडील ९२. हे ऐकले कि आपल्या मनात लगेच "मुलांने त्यांची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे" वगैरे विचार येतात. आपण हे विसरतो कि मुलगा वय ६५ आहे, तो पण स्वत:च "ज्येष्ठ" नागरीक आहे, व त्याचे स्वता:चे काही प्रोब्लेम्स आहेत. त्याला बीपी आहे, त्याची बायपास झालेली आहे, इत्यादी.
२: आई वडील दोघे ८५ च्या पलिकडचे. मुलगा-सून इथेच आहेत, त्याची मुलगी (म्हणजे नात) व जावई अमेरिकेत. नातीच्या बाळंतपणाचे वेळी
तिला आईने तिच्या कडे यावे असे वाटते, त्याची गरज पण आहे. आता सुनेची प्रथम जबाबदारी काय ? भारतात अती-वृद्ध सासू सासरे ? का अमेरिकेत तिची मुलगी?
३:वरील उदाहरणात, आई-वडीलांच्या तब्येती तश्या ठीकच आहेत. ते जेव्ह्ना नव्वदीत असतील, मुलगा-सून स्वत: सत्तरीत असतील. आनखीन किती वर्षे त्यांनी आई-वडीलांच्या सेवेतच काढायची? निवृत्ती नंतरची सोनेरी वर्षे का काय म्हनतात त्याचे काय ?
४: आई सध्या वय ९० वर्षे, गेली चार वर्षे परालीटिक स्ट्रोक ने अंथरुणात आहे. चार वर्षे रोज, (पुंनश्च: रोज) १२ तास नर्स घरी येते व तिचे सर्व काही बिछान्यात करते. मुलगा व सून (दोघे ज्येष्ठ नागरीक) कोण्या टूर बरोबर अमेरिकाऱ्युरोप तर सोडाच, आठवडा भर सिमला-मसूरी पण जाऊ शकत नाही. आता वडील वय ९३ पण अंथरुणाला खिळले. मुलगा जबाबदरी टाळू इच्छित नाही, अजिबात नाहि. पण आता त्याच्याने होत नाही. त्यानी काय करायचे ?
लोकहो, प्रश्न फार कठीण आहेत. हे लक्षात घेतले तरच चर्चा उपयोगी होईल.