कोणताही प्रश्न संकुचित किआ सर्वसमावेशक हे पाहणाऱ्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून असते जेव्हां अगदी मोजकीच मुले पररदेशात जात होती तेव्हां तो संकुचित होता हे खरे पण आता बऱ्याच कुटुंबातील एक किंवा दोनही मुले जाऊ लागली आहेत तेव्हां याला बरेच मोठे परिमाण आहे हे निश्चित ! माझी स्वतःची दोंन्ही मुले काही काळ अमेरिकेत होती. त्या काळातील बरेच अनुभव मी वारी या माझ्या लेखमालिकेत लिहिले आहेत व त्यांचे वास्तव्य आम्ही उभयतांनी खूपच उत्साहाने उपभोगले. त्याच वेळी आमचे काही मित्रही आमच्यासारखेच परदेश वारीवर आले होते व त्यातील काही अपवाद वगळता तेथे अतिशय आनंदात होते
अगदी काही अपवाद म्हणून "येथे आपण काही परत येणार नाही बुवा" असे म्हणणारे निघाले. आपल्या आई वडिलांकडे दुर्लक्ष करणारे अपवादानेच आढळतात अर्थात त्यानी आई वडिलांसाठी परदेशातून परत येऊन आपल्यापाशी राहावे असे म्हणणारे आई बापही विरळाच अर्चनाताईंना सध्या अनुभव नसला तरी त्यांया मुलांवर त्यानी चांगले संस्कार केले असतील व ती पुढे परदेशी गेली तरी ती आपल्या आईवडिलांना अंतर देणार नाहीत हे निश्चित. माझ्या माहितीच्या बऱ्याच जणांच्या मुलांनी आई वडिलांसाठी ग्रीन कार्ड किंवा नागरिकत्वासाठीही अर्ज करण्याची तयारी दाखवली आहे व ते त्यांना नको असल्यास त्यांच्यासाठी भारतात घर नसल्यास तसे घेऊनही दिले आहे् हा प्रश्न समजा मुले परदेशी गेली नाही तरी त्यांनी आईवडिलांचे मूळ गाव बदलल्यासही येऊ शकतो अशा मुलांनीही पालकांना आपल्याबरोबर नेण्याची तयारी दाखवली आहे.
आता ज्यांना एकच अथवा दोन्हीही मुलीच असतील व त्या दोघीही भारतातच पण आईवडिलांच्या गावी नसतील तर त्यांचाही प्रश्न परदेशी
मुले गेलेल्या पालकांपेक्षा काही वेगळा नसतो त्यामुळे पतदेशी मुले जाणे हा प्रश्न इतका गंभीर मानायचे कारण नाही असे माझे अनुभवाचे बोल आहेत