मला वाटते माझा प्रतिसाद भरकटला व म्हणून त्यातला गाभा दृष्टी आड झाला. तसेच, मी "संकुचित" हा शब्द वापरला, तो कुणाला आक्षेपर्ह्य वाटत असल्यास मी तो मागे घेतो. मला काय म्हणणायचे होते ते आता जास्त नेमके पणाने.
१ : जेव्हां (अ) आई-वडील किमान चालते-फिरते असतात, आणि (ब) मुले फारतर पन्नानशीत असतात; तेव्हां फार काही प्रश्न नसतो. खरा प्रश्न सुरू होतो जेव्हां आई-वडील इतके थकतात कि आता त्यांना आपले शरीर-धर्म फक्त स्वतः करता आले तरी नशीब अशी अवस्था होते, + त्याच बरोबर मुले पण वयस्कर झालेली असतात, त्यांना पण थकायला होते.
२ : हा प्रश्न गेल्या काही दशकां पासून वाढत आहे कारण आधुनिक वैद्यकाने (अलोपथीने) शरीरचे यंत्र किती वर्षे चालू ठेवत येईल याची मर्यदा वाढत जात आहे. शेवटी एक वेळ अशी येते कि त्या जगण्यात Quality=0 झालेली असते, उरते ती फक्त Quantity. यातून फार गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. जसे जसे वैद्यक शास्त्र प्रगत होत जाईल, व ते होणरच आहे, हा प्रश्न आणखीन वाढणार आहे.
कित्येकदा अस होत कि कोणी गेल्याची बातमी येते व दुःख वाटण्या ऐवजी सर्वांच्या मनात "सुटला बिचारा" असेच येते. "काल पर्यंत ठीक होते, आणि आज अचनाक गेले" - म्हणजेच शेवटचा दिवस पण गोड झाला - अस होण्या करता फार नशीब लागत. हल्ली अस क्वचितच होत. कारण
regular medical checkup मुळे काही बिघाड होऊ घातला असेल तर त्याची आधीच खबर मिळते, व त्या वर उपाय केले जातात. म्हणून आता "झिजून झिजून" जगणार्यांची संख्या वाढत आहे.
अतीव वार्ध्यक्याने व त्या बरोबर येंणार्या शरीराची झीज, अनेक व्याधी इत्यादीने ग्रासलेल्यांच्या समस्यां वर नेहेमीच विचार होत असतो. पण अश्या लोकांची ज्यांना काळजी घ्यावी लागते त्यांच्या समस्यां वर आपल्या देशात फार विचार होत नाही. care receiver's च्या समस्यां वर विचार होतो पण care giver's च्या समस्यांची मात्र "हे तर तुमचे कर्तव्य आहे" असे सांगून बोळवण होते.
तेव्हां प्रश्न "मुले अमेरिकेत गेल्यास काय" असा नसून, आयुष्य्रेखा "नको तितकी" वाढत आहे, हा आहे.